महाराष्ट्रविदर्भसामाजिक

मलकापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार यांचे आश्वासन

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

कोणत्याही कामांचं भूमिपूजन झाल्यानंतर ते काम दिलेल्या मुदतीतच पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. तर जवळपास सहा महिन्यात सहा या सभागृहाचे काम पूर्णत्वास गेल आहे. या बाबीचे आम्हाला समाधान मिळत असून श्रीराम भक्त हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा येथे आज संपन्न होत असल्याने हा आनंदाचा सोहळा आहे असे भाव आमच्या मनी निर्माण झाला आहे अशी भावना आमदार राजेश एकडे यांनी उमाळी येथे हनुमान मंदिर चा प्राणप्रतिष्ठान सोहळा व सभागृहाचा लोकार्पण सोहळा प्रसंगी प्रकट केले
मौजे उमाळी येथे हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तसेच स्थानिक आमदार निधीतून २५ लाख रुपयांचे सभागृहाचे लोकार्पण आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी यावेळी राष्ट्रवादीचे नेते संतोषराव रायपुरे, काँग्रेसचे नेते अॅड साहेबराव मोरे, बंडू चौधरी, राजू पाटील, प्रवीण पाटील, ज्ञानदेव हिवाळे, अनिल भारंबे, निळूभाऊ तायडे, गजानन म्हैसागर, अॅड दिलीप बगाडे, एस.पी.संबारे सर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी स्मृतींना उजाळा देतांना आमदार राजेश ऐकडे म्हणाले की, या गावात सभागृहाची आवश्यकता असून तशी मागणी ग्रामस्थांनी माझ्याकडे केली असता दुसऱ्याच दिवशी मी सभागृहाचे काम मंजूर केलं. त्यानंतर भूमिपूजन सुद्धा करण्यात आल अन् आज सहा महिन्याच्या कालावधीतच सभागृहाचे काम पूर्णत्वास गेलं किंबहुना आम्ही दिलेल्या शब्दाची पूर्तता झाली याच आम्हाला समाधान आहे. तर यापुढेही विकास कामाच्या संदर्भात काही असल्यास ग्रामस्थांनी आम्हाला आवर्जून सांगावं असं आवाहन करीत गावात स्मशानभूमीची समस्या कायम आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी स्मशानभूमीची जागा निश्चित करा ते कामही आम्ही पूर्णत्वास नेऊ अशी ग्वाही दिली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button