शाळकरी विद्यार्थ्यांची तसेच वृद्ध नागरिकांची शेगाव तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करताना होणारी अडचण लक्षात घेता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना शेगाव आगरास नव्याने 10 बसेस देण्याची शिवसेना शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांची निवेदाद्वारे मागणी..

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
शेगाव तीर्थक्षेत्र असून श्री. संत गजानन महाराजांच्या दर्शनाणाकरीता विदर्भातून शेगाव ला येणाऱ्या भक्तांची संख्या भरपूर आहे , तसेच शेगाव तालुक्याचे ठिकाण असून जवळची मोठी बाजापेठ सुद्धा शेगाव मध्येच आहे त्यामुळे दररोज शेगाव बस प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या भरपूर आहे आणि सद्ध्यास्थित शेगाव आगारामध्ये असलेल्या बसेस त्या तुलनेत कमी आहेत त्यामुळे सर्व ठिकाणी बससेवा उपलब्ध करून दिने शेगाव आगारासाठी कठीण झाले होते याचा त्रास हा सामान्य नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना होत होता ही बाब लक्षात घेता मुंबई मंत्रालय येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे शेगाव आगारास नव्या किमान 10 बसेस तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी शिवसेना शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांनी केली मागणी
यावेळी संजय अवतडे उपजिल्हा प्रमुख, संतोष डिवरे उपजिल्हा प्रमुख, देविदास घोपे उपजिल्हा प्रमुख, राजेंद्र बघे खामगाव तालुका प्रमुख, अजय पारसकर जळगाव तालुका प्रमुख, केशव ढोकणे संग्रामपूर तालुका प्रमुख, सुनील जूनारे नांदुरा तालुका प्रमुख माजी उपजिल्हा प्रमुख संतोष लीप्ते, मा. तालुका प्रमुख उमेश पाटील, गोपाल बोरसे विभाग प्रमुख, मयूर माळी ,शशी पुंडकर , पवन बानाईत, लाहुडकार ई. उपस्थित होते



