तेल्हारा तालुक्यातील आराध्य दैवत,भारतातील माँ लटीयाल भवानी चे दुसऱ्या नंबरचे शक्तिपीठ. मंदिराला चारशे वर्षांचा पुरातण इतिहास

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी
तेल्हारा.दि१९.
तेल्हार शहरामध्ये वसलेले तालुक्यातील आराध्य दैवत माँ लटीयाल भवानी मंदिर, भारतात लटीयाल भवानीचे दोन शक्तिपीठ असुन राजस्थान येथील फलोदी येथे तर दुसरे शक्तिपीठ महाराष्ट्र येथील तेल्हारा येथे आहे. हे मंदीर पुरातन असून या मंदिराला ४०० वर्षा चा इतिहास लाभलेला आहे. माँ लटीयाल भवानीच्या दर्शनाला महाराष्ट्रा सह विविध राज्यातुन भाविक दर्शना करीता येतात इच्छेला पावनारी आई लटीयाल भवानी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे मंदीरामध्ये वर्षभर विविध कार्यक्रम होतात या मंदीराचे देखरेख वारसा वैष्णव परीवारा कडे आहे सद्या अश्वीन शुल्क पक्ष शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी होत आहे. मंदीरामध्ये लटीयाल भवानी मुर्तिचे अभीषेक महाआरती नैवेद्य करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो
तेल्हारा शहरात वैष्णव बैरागी याची सातवि पीढि लटीयाल भवानी मंदीराची नित्य पुजा अर्चना अखंड नंदादीप प्रज्वलन अश्विन शुल्क प्रतिपदेचि घटस्थापना नउ दीवस भवानीची आराधना नैवध्यार्पन व कार्तिक शुक्ल नवमिचे अन्नकुट इत्यादी धार्मिक उपक्रम राबविण्यात येतात भवानी मंदीराचे महंत स्व. कीशोरदास महाराज वैष्णव याचे पुत्र महंत प्रविणदास वैष्णव सहपरिवार यांच्या मार्गदर्शनात व देखरेखीत लटीयाल भवानी मंदीरातील नवरात्रिचे व दैनंदिन कार्यक्रम पार पडतात.



