महाराष्ट्रमुबई

शिक्षक भारतीची सहविचार सभा शहापुर येथे आनंद दिघे महाविघालय मध्ये संपन्न

शहापुर – (सचिन शेलवले )
आज दि.07/10/2023 रोजी सर्व शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांने मिटिंगमध्ये शिक्षणाचे खाजगीकरण,कंत्राटीकरण विरोधात लवकरच मोर्चाचे नियोजन बाबत प्रत्येक संघटनेचे अध्यक्ष यांनी आपले मते व्यक्त केले .सदर सभा संपल्यानंतर शिक्षक भारती चे सहविचार सभेचे अध्यक्ष मा.श्री.अरुण मडके सर म.रा.शि.भा.केंद्रप्रमुख अध्यक्ष, पेन्शन संघटनेचे अध्यक्ष मा.श्री.बाळासाहेब खारीक सर, शिक्षक भारती ठाणे जिल्हा अध्यक्ष माध्य.मा.श्री.एकनाथ तारमळे सर, शिक्षक भारती ठाणे जिल्हा अध्यक्ष प्राथ.मा.श्री.सुरेश विशे सर व शिक्षक भारती सर्व पदाधिकारी व सदस्य वस्तीशाळेचे शिक्षक, आश्रम शाळेचे शिक्षक, नविन मुंबईचे शिक्षक , शहापुर तालुका प्राथामिक व माध्यमिक शिक्षक , ठाणे जिल्हा प्राथामिक व माध्यमिक अनुदानीत व खाजगी शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच कॅनरा बँकेचे मा.श्री.डाॅ.रवीकुमार चौधरी सर, शाखाधिकारी मा.श्रीम.पल्लवी बाबर मॅडम व त्यांचे कर्मचारी यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा साने यांच्या तीन प्रथम क्रमांक विद्यार्थ्यांना इ.5 वी ,6वी ते 7 वी 2500/रुपये चा प्रत्येक विद्यार्थ्याला चेक बॅके मार्फत व आनंद दिघे विद्यालय शहापूर येथील इ.8वी,9वी ते 10 वी प्रथम क्रमांक आलेल्या आदिवासी शिष्यवृत्ती प्रत्येकी 5000/-रुपये चा चेक बॅके मार्फत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.तसेच संघटनेचे प्रास्ताविक श्री.सुरेश विशे सर यांनी सांगितले.संघटनेचे बांधनी व खाजगीकरण, कंत्राटीकरणा विरोधात श्री.एकनाथ तारमळे सर यांनी सांगितले.तसेच सभेचे अध्यक्ष श्री.अरुण मडके सर यांनी संघटनेकडे शिक्षकांचे आलेले प्रश्नांचे निवारण केले.सदर सभेचे सुत्रसंचलन श्री.जयवंत मोगरे सरांनी केले.तसेच आभार प्रदर्शन श्री.नामदेव बांगर सरांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक भारती सदस्यांनी मेहनत घेतली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button