खानदेशजळगावा जिल्हा

ग्रंथपाल संजय क्षत्रिय ( परदेशी) यांच्या कुटूंबास मदत

ग्रंथपाल संजय क्षत्रिय ( परदेशी) यांच्या कुटूंबास मदत
नगरदेवळा आज

दिनांक ०३/१०/२०२३

जळगांव जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने नगरदेवळा येथील लक्ष्मीबाई पवार सार्व. वाचनालयाचे ग्रंथपाल कै. संजय जसनसिंग क्षत्रिय (परदेशी) हदय विकाऱ्याच्या झटक्याने दुःख निधन झाले , वयाच्या ५२ व्या वर्षी अचानक आपल्यातून निघुन गेल्याने त्यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, त्यांच्या पछ्यात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना फारच तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते, म्हणूनच जळगांव जिल्हा ग्रंथालय संघाच्या पदाधिकारी यांनी संजय क्षत्रिय ( परदेशी) यांच्या परिवारास मदतीचा हात देत, जळगांव जिल्हा ग्रंथालय संघा चे जिल्हा अध्यक्ष श्री. एस. डी. पाटील सर यांच्या पुढाकाराने व पाचोरा ग्रंथालय संघ व जिल्ह्यातील ग्रंथालयांच्या वतीने आप आपल्या इच्छे नुसार मदत निधी जमा करण्यात आला. जिल्हा ग्रंथालयाचे उपाध्यक्ष श्री. रविंद्र पाटील, श्री. संजय पाटील कै. संजय जसनसिंग परदेशी, ग्रंथपाल, लक्ष्मीबाई पवार वाचनालय, नगरदेवळा, ता. पाचोरा, जि. जळगाव यांचे आकस्मित निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियाना आर्थिक मदत मिळावी या अनुषंगाने जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील ग्रंथालयाना मदतीचे आव्हान करण्यात आले होते व आज रोजी नगरदेवळा येथे कै. संजय जसनसिंग परदेशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मदतनिधीची रक्कम रु. ११०००/- अकरा हजार देण्यात आली यावेळी जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष श्री रवींद्र पाटील कार्यवाह श्री संजय पाटील व्यवस्थापक सागर बघुरे संचालक श्री गणेश देशमुख पाचोरा तालुका अध्यक्ष श्री यशवंत पाटील, भैया पाटील, श्री. महेंद्र राजपूत तसेच लक्ष्मीबाई पवार वाचनालयाचे संचालक श्री शिवनारायण देवराम जाधव, मिलिंद शेठ दुसाने, श्री राकेश थेपडे, श्री माधवराव शिंदे हे उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button