विसावा भक्त निवास मधील पार्किंगमधून चारचाकी वाहनाची चोरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर
शेगाव येथील विसावा भक्त निवास मधील पार्किंग क्रमांक २ ए येथे उभी केलेली तवेरा कार चोरीला गेल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुमारास उघडकीस आली.
फिर्यादी कन्हैया किसन धांडे (३७) रा. अकोली जि. नागपूर यांनी शहर पो.स्टे. ला दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी २३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या मालकीची एमएच २० बीसी ४५३० क्रमांकाची तवेरा कंपनीची कार आनंदसागर विसावा भक्त निवास येथील पार्किंग क्रमांक २ ए मध्ये उभी करून ठेवली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता ते कार घेण्यासाठी आले असता त्यांना त्याची कार
जागेवर आढळली नाही. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही कार मिळून न आल्याने त्यांनी शहर पो.स्टे. ला कार चोरीला गेल्याची तोंडी तक्रार दाखल केली.
त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द कलम ३७९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोउपनि राहुल काटकडे हे करित आहेत.



