बुलढाणामहाराष्ट्रसांस्कृतिक

गणेश मंडळांनी दहा दिवस मतदार नोंदणीचे स्टॉल लावून राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे! मनसे नेते शैलेश गोंदे यांचे आवाहन..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगे बुलढाणा

संपूर्ण राज्यभर गणेशोत्सोवास सुरुवात झाली आहे १९ ते २८ सप्टेंबर पर्यंत संपूर्ण देशात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. या दहा दिवसात गणेश मंडळाच्या वतीने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यात सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा कार्यक्रमांचा समावेश असतो. या उपक्रमांसोबतच गणेश मंडळांनी दहा दिवस नवीन मतदार नोंदणीचे स्टॉल लावून राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण
शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक शैलेश गोंधणे यांनी केले.
गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे .बुलढाणा जिल्ह्यात आणि चिखली शहरात विविध गणेश मंडळाच्या वतीने अनेक कार्यक्रम राबविले जात आहेत. येणाऱ्या वर्षभरात देशात लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका होणार असून अनेकांना निवडणुकीत आपल्या उमेदवाराला, आपल्या पक्षाला मतदान करण्याची इच्छा असते अनेक तरुण अतिउस्ताहाने पहिल्यांदा मतदान करीत असतात परंतु यासाठी मतदार यादीत नाव असणे महत्त्वाचे असते. येणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार नोंदणी करणे गरजेचे असून प्रत्येकाचे ते कर्तव्य ३१ऑक्टोंबर२०२३ ही तारीख १८ वर्ष वयाच्या नवीन मतदारांना नोंदणीसाठी अंतिम आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यास हातभार म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक गणेश मंडळांनी आपल्या मंडळासमोर दहा दिवस नवीन मतदार नोंदणीचे स्टॉल लावून जास्तीत जास्त मतदान नोंदणी करावी, अशी विनंती व आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक शैलेश गोंधणे यांनी गणेश मंडळांना केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button