तेल्हारा शहरातील होली एंजेल्स स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे हस्ते झाले वृक्षारोपण

*तेल्हारा शहरातील होली एंजेल्स स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे हस्ते झाले वृक्षारोपण
*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तेल्हारा तालुका प्रतिनिधी.
तेल्हारा
दि.16 : तेल्हारा शहरातील होली एंजेल्स होरायझन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांकडुन शाळेच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजीत केला होता,हा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. होली एंजेल्स स्कुलच्या वतीने घेण्यात आलेल्या ह्या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संवर्धनाचा प्रयत्न केला आहे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची संख्या कमी होऊन चालणार नाही असे मत शाळेचे अध्यक्ष राजेश भारती यांनी यावेळी व्यक्त केले. पर्यावरण संवर्धनासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडे लावू व झाडे जगवू उपक्रम राबविला सोबतच प्रत्येक महिन्यात झाडांची किती वाढ झाली ती पाहण्याची जबाबदारी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घेतली.या वृक्षारोपण कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष राजेश भारती , गायत्री भारती, मुख्याध्यापिका कल्याणी देशमुख , शिक्षिका पूजा सावरकर ,ऋतिका नेमाडे , आरती ताथोड , शितल पाटील , पद्मा हिवसे ,मयुरी तराळे ,वैशाली कुकडे,भाग्यश्री कोरडे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.



