खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसांस्कृतिक

डॉ.उल्हास पाटील कृषि महाविद्यालय कृषि कन्यांनी उत्साहात साजरा केला बैल पोळा

जळगाव प्रतिनिधी रणधीर पवार

डॉ.उल्हास पाटील कृषि महाविद्यालय कृषि कन्यांनी उत्साहात साजरा केला बैल पोळा

जळगाव दि १५ — येथील डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि कन्यांनी आज बैल पोळा सण कृषी कन्यांकडून फैजपूर येथे उत्साहात साजरा केला. बैल पोळ्या निमित्त काही सधन शेतकर्‍यांनी बँड-बाजासह वाजत गाजत आपल्या पशुधनाच्या गावातून मिरवणुका काढल्या. या मिरवणुकीमध्ये वृध्द शेतकर्‍यांसह तरुण शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.वर्षभर शेतात शेतकर्‍यांची मदत करण्यासाठी अपार कष्ट करण्यार्‍या शेतकर्‍यांचा सच्चा मिञ बैल यांना बैल पोळ्याच्या दिवशी गळ्यात घुंगराच्या माळा, शिंगाला रंग व अंगावर रंगाने विविध प्रकारची सजावट व अंगावर झुली या पध्दतीने पोळ्या निमित्त सजवले.बैलांची व इतर पशु धनाची गावातून शेतकर्‍यांकडून मिरवणुका काढण्यात आल्या. घरात पुरण पोळीचा स्वयंपाक करुन बैलाची पुजा करुन बैलांना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली. वर्षभर शेतातील विविध कामात शेतकर्‍यांना मदत करणार्‍या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात येतो.बैलपोळ्या निमित्त या भागात शेतकरी दिवसभर उपाशी राहुन बैलाचा उपहास करतात बैलांना सायंकाळी पुरणपोळीचे जेवण दिल्या नंतरच शेतकरी जेवण करतात. बैल पोळ्या निमित्त शेतकर्‍यांनी बैलाची सजावट करुन घरी पूरण पोळीचा स्वयंपाक करुन सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बैलाची व इतर पशुधनाची विधीवत पुजा करुन बैलांना व इतर पशुधनाला पुरणपोळीचे जेवण दिल्या नतंर शेतकर्‍यांनी जेवण करुन उपवास सोडला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button