महाराष्ट्रविदर्भशेती

मेहकर शहरात भरला आधुनिक ट्रॅक्टर पोळा! सजवलेल्या ट्रॅक्टरची निघाली मिरवणूक ; शिवसेना शहर प्रमुख किशोर गारोळे यांची संकल्पना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

कृषी प्रधान असणाऱ्या आपल्या देशात पोळा सणाला अन्यसाधारण महत्त्व आहे. शेतीत मशागत करणाऱ्या बैलांना सजून मुळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु मागील काही काळापासून शेतकरी आधुनिक शेती करत आहेत त्यामुळे बैलांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली असून पोळा या सणाच्या दिवशी मेकर शहरात अनोखा ट्रॅक्टर पोळा दरवर्षी याही वर्षी शिवसेना (उबाठा) चे शहर प्रमुख किशोर गारोळे यांच्या संकल्पनेतून भरला होता.

जानेफळ रोडवरील शिवसेना (उबाठ ) संपर्क कार्यालयापासून या पोळ्याची सुरुवात झाली. शहर तसेच ग्रामीण भागातून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टर सजवून त्या ठिकाणी आणले होते. यावेळी सर्वप्रथम शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख आशिष राहटे यांच्या हस्ते त्या ठिकाणी ट्रॅक्टरचे पूजन करून या पोळ्याला सुरुवात करण्यात आली. नंतर सजवलेल्या ट्रॅक्टरची मेहकर शहरातून भव्य अशी मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली. जानेफळ चौक येथून या ट्रॅक्टर मिरवणुकीला सुरुवात झाली.
त्यानंतर जिजाऊ चौक, जुने बस स्टँड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका चौक, स्वर्गीय दिलीपराव रहाटे चौक, या मार्गाने ग्रामदेवता शीतला माता मंदिरावर दर्शन घेत त्याच मार्गाने परत जानेफळ रोडवरील शिवसेना (उबाठा) संपर्क कार्यालयासमोर या पोळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी शहर तसेच ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन या पोळ्यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना (उबाठा) चे तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, युवसेना तालुकाप्रमुख आकाश घोडे, नेते शाम पाटील निकम, संदीप गवई, अमोल बोरे, भरत चेके, असलम शाह, शेख खलील आदी सह पदाधिकारी शेतकरी बांधव उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button