अति विराट मराठा क्रांती मोर्चा ला थोड्याच वेळात होणार सुरुवात! बुलढाणा शहर भगवे मय!१०० ” पी आय” ची मोर्चावर नजर

अति विराट मराठा क्रांती मोर्चा ला थोड्याच वेळात होणार सुरुवात! बुलढाणा शहर भगवे मय!१०० ” पी आय” ची मोर्चावर नजर
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
सकल मराठा समाजाचा विराट मोर्चा आज,१३ सप्टेंबर रोजी बुलढाणा शहरात निघणार आहे. थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या उपोषणा स्थळी लाठीचार्ज झाल्याने मराठा बांधव संतप्त झाले आहेत. मराठा आरक्षण मिळेपर्यंत आता मागे हटायचे नाही असा निर्णयच आता मराठा समाजाने घेतला आहे. त्या अनुषंगाने होणाऱ्या आजच्या मोर्चाची जय्यत तयारी झाली असून बुलढाण्यात लाखो मराठा बांधव जमायला सुरुवात झाली आहे.
शहरात मोठी गर्दी जमणार असल्याने पोलिसांनी तगड्या पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले एस पी, २ अप्पर पोलीस अधीक्षक, ६ डी वाय एस पी, १०० पी आय दर्जाचे अधिकारी मोर्चाचे बंदोबस्तावर नजर ठेवणार आहेत. याआधी २०१६ ला झालेला मोर्चा अतिविराट ठरला होता, आजच्या मोर्चाला देखील मराठा बांधवांचा जनसागर उसळण्याची शक्यता आहे.
आज होत असलेल्या मोर्चाला जरांगे पाटीलांचे कुटुंबीय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोर्चाचे महत्त्व वाढणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार जरांगे पाटलांची मुलगी या मोर्चाला संबोधित करणार आहे.



