ठाण्यात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जाळला भुजबळांचा पुतळा.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर बीड येथे झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद सोमवारी ठाण्यात उमटले. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भुजबळ यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा जाळला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिलाध्यक्षा सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.यावेळी कार्यकर्त्याकडून भुजबळ यांची गद्दार असा उल्लेख करत त्यांच्या पुतळ्यास जोडे मारून तो जाळण्यात आला. यावेळी कार्यकर्त्याकडून भुजबळ यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. बीड येथे झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. “साहेब म्हणतात… माझी चूक झाली, माफी मागतो. तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार.



