जाहिरातनांदेड जिल्हावार्तानाशिक

नेरूळ येथे इमारतीचा स्लॅब कोसळून दोन ठार.

नेरूळ येथे इमारतीचा स्लॅब कोसळून दोन ठार.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर नेरूळ सेक्टर ६ येथे बुधवारी रात्री आठ वाजता चार मजली इमारतीतील एका विंगचा स्लॅब खालील दोन मजल्यावर कोसळून एक महिला व एक पुरुष ठार झाले. तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना डॉ. डी वाय पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नेरूळ येथे सेक्टर ६ येथील तुलसी भवन इमारत आहे. या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर लादी लावण्याचे काम सुरू होते. अचानक तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याने खालील दोन स्लॅब देखील कोसळले. यात एका २ जणांचा मृत्यू झाला. तर इतर चार जण जखमी झाले. ही घटना कळताच आयुक्त राजेश नार्वेकर, मुख्य अभियंता संजय देसाई , प्रमुख बाबासाहेब राजळे यांनी धाव घेतली. अग्निशमन दलाने तातडीने डेब्रिज हटवण्यात सुरुवात करत जखमींना रूग्णालयात दाखल केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button