खानदेशजळगावा जिल्हा

पाचोरा येथील पत्रकारावर हल्ला करणाऱ्या लोकप्रतिधी निषेधार्थ पत्रकारांचे निवेदन

*पाचोरा येथील पत्रकारावर हल्ला करणाऱ्या लोकप्रतिधी निषेधार्थ पत्रकारांचे निवेदन*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

जळगांव जिल्ह्यातील पाचोरा येथील संदीप महाजन या पत्रकारास आमदार पाटील यांनी शिवीगाळ करून गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून मारहान केली.यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली शेगाव तालुका अध्यक्ष शेख इस्माईल व शेगाव तालुका उपाध्यक्ष श्याम पहुरकर व शेगांव तालुका पत्रकार यांच्या वतीने शेगाव पोलिस स्टेशन व तहसील कार्यालय शेगाव यांना एकत्रितरीत्या निवेदन देण्यात आलेले आहे निवेदनात नमूद महाराष्ट्र विधान- मंडळाचे अधीनियम नुसार मा. राज्यपाल पत्रकारांच्या सुरक्षेकरिता केलेल्या विनियम व प्रसार माध्यमातील पत्रकारावर होणाच्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी २०१९ च्या अधिनियम 23 प्रमाणे मा. राष्ट्रपती यांच्या संमतीने दि. ८ नोव्हे. २०१९ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये पत्रकार सुरक्षा कायदा तयार झाला असताना लोकशाहीच्या आधरस्तभावर अन्याय होत आहे पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी झटतो अश्या वेळी एका पत्रकारावर लोकप्रतिनिधीकडून हल्ला होणे हि अत्यंत निंदणीय बाब आहे. त्यामुळे अशा लोकप्रतिनिधीवर कठोर कार्यवाही व्हावी, याकरिता राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली. शेगाव तालुका कडून निवेदन देण्यात आले आहेयावेळी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष रवी भाऊ शेगोकार, विदर्भ सचिव शितलताई शेगोकार अध्यक्ष स्माईल तालुका तालुका सहसचिव संजय सुरवाडे शहराध्यक्ष मोहम्मद शरीफ मोहम्मद समीर शेख कदीर लक्ष्मण कानेरकर सिद्धेश्वर निर्मल रविभाऊ शिरसकर मिलिंद चराटे डॉ नदीम खान, महादेव अजने हे उपस्थित होते .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button