
**बाल विकास मंदिर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची कराटे स्पर्धेत बाजी.*दोन सुवर्ण पदकाची कमाई.* वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड मालेगाव – : श्री व्यंकटेश सेवा समिती वाशिम द्वारा संचलित बालविकास मंदिर प्राथमिक शाळा मालेगाव येथील मुलींची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये मारली बाजी 20 ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये बालविकास मंदिर प्राथ. शाळा मालेगाव विद्यार्थिनी श्रावणी संतोष भालेराव वयोगट 10 करुणा शशिकांत खरात वयोगट 13 यामध्ये दोघींनी सुवर्णपदक मिळविले. व सोबतच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या. या खेळाडूंचा मुलींचा शाळेमध्ये सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे , क्रीडा शिक्षक जीजेबा घुगे व कराटे प्रशिक्षक देवानंद वैद्य व पालक,शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पालक मुख्याध्यापक व शिक्षक वृंद या सर्वांचेच मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दलबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजयराव जाधव साहेब ,संचालक मंडळ व पालक यांच्याकडुन विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे .



