बुलढाणामहाराष्ट्र

चोंढी टाकळेश्वर येथे भव्य बौद्ध धम्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन…!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- ३ एप्रिल २०२६
आ. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त 17 एप्रिल रोजी होणार सोहळा तालुक्यातील चोंढी टाकळेश्वर ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा येथे सामाजिक ऐक्य, समता आणि साधेपणाचा संदेश देणारा भव्य बौद्ध धम्मीय सामूहिक विवाह संस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. हा सोहळा आ. प्रकाश आंबेडकर (बाळासाहेब आंबेडकर) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला असून, संपूर्ण परिसरात या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.
रविवार, दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1.30 वाजता हा सोहळा पार पडणार असून, ठिकाण म्हणून चोंढी टाकळेश्वर येथे भव्य मंडप उभारण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी आयोजकांकडून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे.या उपक्रमाचे आयोजन जैन फाउंडेशन निवाणा, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा मिळावा, तसेच विवाह सोहळे साधेपणाने आणि बौद्ध धम्माच्या तत्त्वांनुसार पार पाडावेत, या उद्देशाने हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून मा. किशोरसाहेब भिडे ता.अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी संग्रामपूर उपस्थित राहणार आहेत, तर प्रमुख अतिथी म्हणून मा. आमदार डॉ. संजयजी कुटे माजी कामगार मंत्री जळगाव जामोद मतदार संघ यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राजेश्वर देशमुख अध्यक्ष शिक्षण संस्था निवाणा राहणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून मा. प्रा. सुभाष सिरसाट हे जबाबदारी पार पाडणार आहेत.
तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात मोठ्या संख्येने जोडपी सहभागी होऊन नवजीवनाची सुरुवात करणार आहेत.सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम हा सामूहिक विवाह सोहळा केवळ विवाह कार्यक्रम नसून, सामाजिक समतेचा व बंधुत्वाचा संदेश देणारा उपक्रम आहे. कमी खर्चात, अनाठायी दिखाव्याला फाटा देत आणि बौद्ध धम्माच्या शिकवणुकी नुसार साधेपणाने विवाह करण्यावर भर देण्यात येणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button