खानदेशजळगावा जिल्हा

भाचा,पुतण्या,जावई का पळून गेले?

भाचा,पुतण्या,जावई का पळून गेले?

जे लोक धर्मनिरपेक्ष राजकारण करतात, त्यांच्या सोबत लोक वेळ काढून आले पाहिजे.असे आम्हाला वाटते.आपण कांग्रेस राष्ट्रवादी ला धर्मनिरपेक्ष समजतो.पण हे तर फक्त वारसाहक्काने पक्ष चालवतात.बाहेरील माणूस कितीही चांगला असला तरीही त्यांना चालत नाही. त्यामुळेच अनेक लोक धर्मनिरपेक्ष असूनही भाजप सोबत जातात.भाजपात असूनही दंगा धोपा करीत नाहीत.ते काम विषारी , आडदांड लोकांना सोपवतात. आज जळगाव जिल्ह्यातील कांग्रेस व राष्ट्रवादी कडे कोण नेता आहे? राष्ट्रवादीत खडसेंना घेतले ,ते तरी उघड उघड बोलतात‌.बाकी तर तोंड ही दाखवत नाहीत.ते अंधारात राहातात.सांगा, कांग्रेस मधील कोण माणूस राजकीय काम करतो?सांगा, राष्ट्रवादी मधे खडसे शिवाय कोण माणूस राजकीय बोलतो?बाकी फक्त पाहुणे आले की,ठेवणीतले कपडे घालून येतात.एकदा केलेली इस्री वर्षभर चालते. म्हणून अनेक लोक धर्मनिरपेक्ष असूनही भाजप मधे जातात.तेथे अडमिशन ओपन आहे.इतर पक्षात अडमिशन क्लोज झाले आहेत.म्हणे कोणी बाहेर चा नेता आमच्या पक्षात आला तर आमचे महत्त्व कमी होईल.म्हणून त्यांनी पदे घट्ट बगलेत दाबून ठेवली आहेत.काहींनी पायाखाली दाबून ठेवलेली आहेत.काहींनी तर अंथरूणाखाली ठेवून वरून आडवे झोपलेले आहेत.जर कोणी शहाणा दिडशहाणा दरवाजा जवळ आला तर सांगतात,आधी आमची स्तुती करा.आम्ही सज्जन असल्याचा पोवाडा म्हणा. तुमच्या वाढदिवसाला आमचे फोटो लावा. हे ज्याला जमते तो बिचारा काही दिवस थांबतो.दुसरी बस आली कि,बसमधे बसून निघून जातो.तरीही हे घरात लपलेले म्हणतात, आम्ही त्यांची हकालपट्टी केली.अरे!तो पळून गेला.तुम्ही काय हकालपट्टी करणार?आधी त्याची तोंडपट्टी तर ऐकून घेतली असती . असे घरात दुमडून ठेवलेले कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उपनेते कंटाळतात.जीव गुदमरतो.तेंव्हा मोकळा श्वास घेण्यासाठी विखे,शिंदे, अजितदादा यांचेसोबत पळून जातात.इकडे हे गद्दार गद्दार ओरडतात.ते सुद्धा दरवाजाच्या फटीतूनच.कोण म्हणे ,माझा बाप चोरला.कोण म्हणे माझे चिन्ह चोरले.कोण म्हणे माझा गांधी चोरला.कोण म्हणे माझा फोटो चोरला.आता आपण विचार करा.या काय चोरायच्या वस्तू आहेत का? एक दिड वर्षांपासून महाराष्ट्रात असा पोरखेळ चालू आहे.यांना जनतेचे प्रश्न दिसत नाहीत.सांगितले तरी कळत नाही.ते अट घालतात.आधी माझा बाप परत आणून दे.आधी माझे चिन्ह परत मिळवून दे.आधी माझा फोटो लावणे बंद करून दे.आधी मला माझी खुर्ची मिळवून दे.मग,तुमचे प्रश्न सोडवू. इतके सर्व आणून देणे, मिळवून देणे कोणाला वेळ आहे! त्यापेक्षा लोक म्हणतात,ज्याला बाप, चिन्ह, खुर्ची,फोटो सांभाळता येत नाही तो आपल्याला कसा काय सांभाळेल? इतकी डोकेदुखी लावून घेण्यापेक्षा चला भाजप मधे.तेथे गेलो तर किमान इडी,बेडी तर लागणार नाही.पोलिस हात लावणार नाहीत.म्हणून यांचा भाचा, पुतण्या,जावई, व्याही , साला,मेव्हणा भाजपात पळून गेले…. शिवराम पाटील

महाराष्ट्र जागृत

जनमंचजळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button