आमदार राजेश भाऊ एकडे यांचे विविध प्रश्न मिटले

आमदार राजेश भाऊ एकडे यांचे विविध प्रश्न मिटले
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
अमरावती ते चिखली” राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील नांदुरा-चिखली या ४५ कि.मी. लांबी व रु.८०० कोटी निधीच्या विकास कामाचे आज रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री.नितीनजी गडकरी यांच्याहस्ते लोकार्पण संपन्न झाले, सदर नांदुरा-चिखली खंडाच्या चौपदरीकरण प्रकल्पाची एकूण लांबी ४५ किमी असून या अंतर्गत ६ किमीचा नांदुरा ग्रीनफील्ड बायपास, मलकापुर आरओबी, ४ प्रमुख पुल, १८ छोटे पुल, ११ कल्व्हर्ट, ३ वाहन अंडरपास, ४ पादचारी अंडरपास, ११.५३ किमी दुपदरी सर्व्हिस रोड, २० बस शेल्टर, १ ट्रक ले बाई यांचा समावेश आहे. यावेळी आमदार राजेश एकडे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 (6) मध्ये संपादित केलेल्या शेत जमिनीचा वाढीव मोबदला मिळणे बाबत व राज्य महामार्ग-753अ रस्त्यास वळणमार्ग (बेलाड फाटा ते दाताळा) बायपास मंजुर करणे बाबत तेसेच विविध विकास कामांचे बाबत निवेदन देऊन, निधी उपलब्ध करणे बाबत यावेळी केंद्रीय मंत्री श्री.नितीनजी गडकरी यांना मागणी केली.



