बुलढाणामहाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष श्री .गणेशजी चौकसे सह किन्ही महादेव येथील शेतकरी यांनी तहसीलदारांना दिले निवेदन

वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष श्री .गणेशजी चौकसे सह किन्ही महादेव येथील शेतकरी यांनी तहसीलदारांना दिले निवेदन….( जी.डी.रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी). मौजे कन्ही महादेव तालुका खामगाव येथील शेतकऱ्यांनी सन 2022 23 ,मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे येथील रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. परंतु घरी बसून सर्वे करण्यात आला अशी तक्रार येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली. रब्बी पिकांचे सर्वे चुकीचे झाल्याने पात्र लाभार्थ्यांना त्या लाभा पासून वंचित ठेवण्यात आले अशी तक्रार निवेदनाद्वारे दिली आहे. यामध्ये वरील चुकीचा झालेला रब्बी पिकाचा सर्वे पुन्हा करण्यात यावा अशी मागणी देखील येथील शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांमध्ये ,हरिदास गव्हाणे, श्रीकृष्ण घाटोळ, शुभम धानोरे, अंकुश तिव्हणे, भारत आरख , विश्वनाथ राखोंडे, अविनाश मोरे, सागर देशमुख, रवींद्र राजगुरू, अरविंद बोचरे, पांडुरंग धनबर , आदींच्या निवेदनावर सह्या केल्या आहेत. चुकीचा झालेला सर्वे पुन्हा करण्यात यावा अशी मागणी येथील शेतकरी करीत आहे……

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button