जळगावा जिल्हाजाहिरात

आसनगाव येथे वाचनालय व अभ्यासिकेचे उद्घाटन व पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न…

*आसनगाव येथे वाचनालय व अभ्यासिकेचे उद्घाटन व पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न…*——————- शहापुर(प्रतिनिधी):कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका शहापूरच्या संकल्पनेतून शाखेच्या पहिल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून देशाच्या ७७व्या स्वातंत्र्यदिनी आसनगाव येथे *जगद्गुरू संत तुकाराम महाराज* वाचनालय आणि अभ्यासिकेचे उद्घाटन कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई संघाचे अध्यक्ष मा.भूषणजी बरे साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीयातील शहापूर व मुरबाड तालुक्यातील पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. शहापूर तालुक्यातील आसनगाव या मध्यवर्ती ठिकाणी तालुक्यातील विद्यार्थी व वाचकांसाठी कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई शाखा तालुका शहापूरच्या संकल्पनेने व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून साकार झालेल्या वाचनालयाचा उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाची व ज्ञानाची असलेली गरज पूर्ण करण्याकरीता ग्रामपंचायत आसनगावने आपले जुने कार्यालय या वाचनालय व अभ्यासिकेसाठी एका ठरावाद्वारे मोफत उपलब्ध करून दिले. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके आणि महापुरुषांची जीवनचरित्रे, कथा, कादंबऱ्या,ऐतिहासिक व सांस्कृतिक इतिहास, विज्ञान यासह विविध विषयांवरील पुस्तके वाचनालयात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सदर कार्यक्रमामध्ये कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष मा.भूषण बरे, सहसचिव हरीश्चंद्र पाटील,आसनगांव ग्रामपंचायत संरपच रविना कचरे, उपसरपंच राहूल चंदे, समाजसेवक-दाते डाॅ.रामचंद्र देसले,राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ कोकण अध्यक्ष अरुण मडके, ग्रामस्थ विजय चंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपसरपंच राहूल चंदे व सरपंच रविना कचरे यांनी वाचनालयासह अन्य उपक्रमांसाठी सहकार्य करण्यास ग्रामपंचायत सदैव तयार असल्याची ग्वाही दिली. १०३ वर्षांचा इतिहास असलेल्या कुणबी समाजोन्नती संघाच्या शाखांपैकी अल्प कालावधीत विविध उपक्रम राबवून उभारी घेतलेली शाखा म्हणून शहापूर शाखेचा उल्लेख करावा लागेल असे गौरवोद्गगार संघाचे सहसचिव हरीश्चंद्र पाटील यांनी व्यक्त केले. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात मा.भूषण बरे यांनी सामाजिक व शैक्षणिक दृष्टया संघाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच वाचनालयामध्ये विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करुन तरुणांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी संधी उपलब्ध करुन दिल्याबद्ल कौतुक केले. विशेष म्हणजे वाचनालयासाठी हजरा शेख या तरूणीने रोख रक्कम देऊन उपस्थितांची मने जिंकली. तिची ही कृती बदलत्या काळानुसार बदललेल्या समाजाच्या गरजा सांगुन गेली. सामाजिक व प्रबोधनात्मक काम करणाऱ्या कुणबी समाजोन्नती संघ,मुंबईच्या शहापूर शाखेच्या विविध उपक्रमांना वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून प्रसिद्धी देणाऱ्या मुरबाड व शहापूर तालुक्यातील पत्रकारांना सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. सन्मान करण्यात आलेल्या पत्रकारांच्या वतीने नामदेव शेलार व संतोष दवणे यांनी आपले मनोगते व्यक्त केली व शाखेच्या कार्यास शुभेच्छा देऊन यापुढेही शाखेस सहकार्य राहील असे सांगितले.तर अनेकांनी यापुढेही वाचनालयास अर्थसहाय्य करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी आसनगांव मधील समाजसेवक कृष्णा चंदे, सुरेश पाटोळे यांचेसह,पं.स.सदस्य, ग्रामस्थ व शाखेचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रसाद फर्डे व अनिल भोईर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर चंदे यांनी केले. तद्नंतर शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली.तर दिवसभरात स्वातंत्र्यदिन समारोह प्रसंगी शेंद्रुण विभागातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रगती विद्यालय ठिळे या संस्थेस शाखेच्या वतीने दोन फॅन भेट देण्यात आले. हा संपुर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखेचे पदाधिकारी, कार्यकारीणी सदस्य व आसनगांव विभागातील सदस्यांनी मोलाची कामगिरी बजावली.अल्पावधीत समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी करत असलेल्या या कार्यामुळे जनमानसात शाखेची अगळीवेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button