कचरा वेचक महिलांना रेशन कार्ड मिळावे

*कचरा वेचक महिलांना रेशन कार्ड मिळावे यासाठी सुधर्माची कलेक्टर साहेबांना विनंती*
मेहरून तंबापुरा परिसरातील कचरा वेचक महिलांना रेशन कार्ड नसल्यामुळे रेशन मिळत नाही यासाठी त्यांचे सर्व कागदपत्र जमवून एक निवेदन सुधर्माच्या वतीने जळगावचे कलेक्टर श्री आयुष्य प्रसाद यांना देण्यात आले यावेळी सर्व कचरा वेचक महिला उपस्थित होत्या कलेक्टर साहेबांनी त्यांची व्यथा जाणून घेतली त्यांचे वतीने सुधर्माचे अध्यक्ष श्री हेमंत बेलसरे यांनी सांगितले की या सर्व महिला कचरा वेचून उदरनिर्वाह करतात यांचे रोजचे उत्पन्न अत्यंत अल्प असून त्यांना रेशन कार्ड नसल्यामुळे रेशन मिळत नाही आपण स्वतः लक्ष घालून यासाठी मदत करावी यावर कलेक्टर साहेबांनी लगेचच तहसीलदारांना फोन करून याची माहिती दिली व त्यांना जाऊन भेटा तुमचे काम नक्की होईल असे आश्वासन देखील दिले यावेळी एकूण 13 महिला उपस्थित होत्या सुधर्माचे श्री सूर्यकांत हिवरकर नितीन तायडे यावेळी उपस्थित होते .



