हिवरा गणपती येथे बालविवाह विरोधी जनजागृती

*हिवरा गणपती येथे बालविवाह विरोधी जनजागृती
*”इंडियन सोशल सर्विस युनिट ऑफ एज्युकेशन यांच्या पुढाकार”वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड वाशिम : – 4 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी दिनानिमित्त हिवरा गणपती येथे बाल विवाह, बाल लैंगिक अत्याचार व बाल कामगार विरोधात जनजागृती करण्यात आली यावेळी लोकांना बालविवाह विरोधी शपथ ही देण्यात आली.इंडियन सोशल सर्विस युनिट ऑफ एज्युकेशन नागपुर,जिल्हा कार्यालय वाशिम ने अंगणवाड्या,पंचायती या शिवाय घरोघरी जाऊन बालविवाह,बालमजुर, बाललैंगिक अत्याचार विरुद्ध जनजागृती मोहीम राबवित आहे. गणेश चतुर्थीच्या औचित्य साधुन हिवरा गणपती या गावी याञेचे आयोजन असते. व दर्शनासाठी आजुबाजूच्या गावातील लोक एकत्रित येतात. त्या अनुषंगाने जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. कार्यक्रमामध्ये सामुहिक शपथ देण्यात आली व वैयक्तिक शपथ पञ भरुन घेण्यात आले व बालविवाहाचे दुष्परिणाम, बालकांची होणारी बाल तस्करी व बाल लैंगिक अत्याचार या बद्दल लोकांना माहीती देण्यात आली. कार्यक्रमामध्ये हिवरा गणपती गावचे सरपंच.सौ. ज्योती चवरे,उपसरपंच.श्री विनोद देशमुख तंटामुक्ती अध्यक्ष. विश्वासराव देशमुख, कृषीसहायक डि.एस.खुडे, ग्रामपंचायत सदस्य.संजयराव देशमुख देवस्थान व्यवस्थापन समिती.पंजाबराव माणिकराव देशमुख,रमाकांत गुलाबराव देशमुख,संजाबराव देशमुख व देवस्थान पुजारी सुहासराव जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.व इंडियन सोशल सर्विस युनिट ऑ एज्युकेशन नागपुर, जिल्हा कार्यालय वाशिमच्या वतीने जिल्ह्यात बालविवाह जनजागृती मोहीम राबविली जात आहे. यावेळी जिल्हा समन्वयक सिद्धार्थ पडतात, समुपदेशन अलका वानखेडे, सामुदायिक सामाजिक कार्यकर्ते विनोद अंभोरे,निलेश अंभोरे,राणी भगत, ओम साखरकर,गणेश मगर आदींनी जनजागृतीपर सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.



