शेगांव येथील रोकडिया नगरामध्ये घरफोडी दीड लाखा लंपास

शेगांव येथील रोकडिया नगरामध्ये घरफोडी दीड लाखा लंपास
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगाव | शहरातील रोकडिया नगरात अज्ञात चोरट्याने घरी कोणी नसल्याची संधी साधून एक घर फोडले व घरातील दीड लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना २७ व २८ जुलै दरम्यान घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी १ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत प्रभु बबनराव सपकाळ (देशमुख), वय ३३ वर्ष रा. रोकडिया नगर शेगाव यांनी शहर पो.स्टे. ला फिर्याद दिली. ते परिवारासह बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे कुलूप उघडून बेडरूम मधील फर्निचर कपाटाचे लॉकर मधून सोन्या चा नेकलेस वजन १४ ग्राम सोन्याचे कानातील रिंग वजन ३ ग्रॅम की अंदाजे १५, ९६०, माझी सोन्याची अंगठी वजन ४ ग्रॅम किंमत अंदाजे २१,२८०, सोन्याच्या २ अंगठ्या वजन ६ ग्रॅम किंमत अंदाजे ३१,९२० असे एकूण २७ ग्रॅम प्रति ५,३२० रूपयेप्रमाणे १ लाख ४३ हजार ६४० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत ते घरी आल्यानंतर त्यांना समजले. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५७, ४५४, ३८० भांदविनुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पीएसआय राहुल कातकाडे करत आहेत.



