*गो.से. महाविद्यालयाच्या रा.से.यो पथका द्वारा अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदत निधी जमा*.

*गो.से. महाविद्यालयाच्या रा.से.यो पथका द्वारा अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदत निधी जमा*.
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठेखामगाव: स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गो.से. महाविद्यालय खामगावच्या रासेयो पथका द्वारा संग्रामपूर तथा जळगाव जामोद या ठिकाणी जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी भक्कम मदत स्वयंसेवक तथा स्वयंसेविकांच्या द्वारा जमा करण्यात आली. जमा करण्यात आलेली रक्कम ही अतिवृष्टीग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उपयोगात आणली जाणार आहे. या अतिवृष्टीमध्ये अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत. त्यामध्ये कुणाचं घर वाहून गेलंय, तर कुणाच्या संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत तयार झाली आहे. ही स्थिती लक्षात घेता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक तथा स्वयंसेविकांनी कुठेतरी फुलाच्या पाकळीची मदत का होईना आपल्याकडून समाजामध्ये गेली पाहिजे या भावनेतून सदर निधी जमा केला. या निधीच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी व त्यांच्या मुलांसाठी विविध स्वरूपामध्ये गो.से महाविद्यालय खामगाव यांच्याकडून मदत पुरवण्यात येणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धनंजय तळवणकर यांनी दिली. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे भरीव सहकार्य तथा मदत लाभली असून भविष्यातही आम्ही समाजसेवेकरता कटिबद्ध आहोत अशी माहिती कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दीपक नागरिक यांनी दिली. या उपक्रमामध्ये रा.से. यो योजनेचे स्वयंसेवक प्रशांजित गव्हांदे,कार्तिक नेमाने,ओम अडेल,सागर वारे,कु.श्रुती खंडारे,भाग्यश्री निमकर्डे,गोपाल घुले, तेजस इटणारे,ऋषिकेश राऊत,आशुतोष ठोंबरे,आनंद शेळके,अजय राठोड या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.मा संपादक/ वार्ताहर कृपया सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकांमध्ये प्रसिद्ध करून उपकृत करावे ही विनंती प्राचार्य, गोसे महाविद्यालय खामगाव



