खानदेशजळगावा जिल्हा

अनुसूचित जाती, जमती अत्याचार विरोधी संघर्ष समिती , जळगाव

अनुसूचित जाती, जमती अत्याचार विरोधी संघर्ष समिती , जळगाव
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
मणिपूर येथील सरकार बर्खास्त करण्यात यावे

अनुसूचित जाती जमाती समितीची मागणी

जळगाव :- मणिपूर येथे गेल्या ८५ दिवसांपासून सलग हिंसा होत असून सुमारे ३०० लोक त्यात मृत्युमुखी पडले असून १५०० लोक जखमी झाले आहेत , काही महिलांची नग्न धींड काढण्यात आली आहे , अत्यंत भयग्रस्त होवून हजारोंच्या संखेने लोक अन्य राज्यात निघून जात आहेत , तिथं कायदा व सुव्यवस्था पूर्णतः कोलमडली असल्याने तेथील सरकार बर्खास्त करुन राष्ट्रपति राजवट लागू करावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रपतिंना जळगाव जिल्हाधिकारी यांचे मार्फत अनुसूचित जाती , जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समिती , जळगाव तर्फे उपजिल्हाधिकारी सौ. शुभांगी भारदे यांना देण्यात आले .
समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे , साहित्यिक जयसिंग वाघ , रमेश सोनवणे , दिलीप सपकाळे , सोमा भालेराव , सुरेश तायड़े , साहेबराव वानखेडे , हरिश्चंद्र सोनवणे , महेंद्र केदारे , प्रा.प्रितलाल पवार , चंद्रकांत नंनवरे , वाल्मीक सपकाळे , संजय सपकाळे , युवराज सुरवाड़े व अन्य पदाधिकारी हजर होते .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button