शेगाव शहर पोलिसांनी केली जुगार खेळणाऱ्यांवर कार्यवाही

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
मिळालेली माहिती अशी की, आज दिनांक 04/07/2023 रोजी परी पोलीस उपाधीक्षक श्री विवेक पाटील व पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे मार्गदर्शना प्रमाणे शेगाव शहर पोलिसांनी शिवाजीनगर परिसरामध्ये सायंकाळी 6:30 वा सुमारास जुगार कायदा अंतर्गत छापा कार्यवाही करून सार्वजनिक ठिकाणी मोकळया जागेत ताश पत्त्यावर एक्का बादशाहा नावाचा जुगार पैशाचे हारजित वर खेळणारे आरोपी 1) मधुकर उत्तमराव जाधव वय 67 वर्षे, रा. शिवाजी नगर शेगाव (2) सुभाष उत्तमराव डांबे वय 63 वर्षे, रा. शिवाजी नगर शेगाव (3) संजय मधुकर तिडके वय 56 वर्षे, रा. शिवाजी नगर शेगाव 4) संदीप चिंतामण देवकर वय 26 वर्षे, रा. शिवाजी नगर शेगाव 5) शेख शकील शेख शेख जहुर वय 53 वर्ष, रा. शिवाजी नगर शेगाव 6) सुनिल कृष्णराव सोलनकर वय 55 वर्षे, रा. शिवाजी नगर शेगाव यांच्यावर छापा कार्यवाही करून त्यांच्याकडून एकुण नगदी व मोबाईलसह 42,120/-रू डावावर पडलेले नगदी 180/-रूपये व डावावर पडलेला ताशपत्ता किं. 20/-रू असा एकुण 42,320/- रूपयाचा मुद्देमाल पुराव्या कामे जप्त करून ताब्यात घेतला सविस्तर पंचनामा कार्यवाही करून पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक निलेश गाडगे हे करीत आहे.



