जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर पो स्टे चे पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी घेतली डीजे आणि बँड चालक- मालकांची बैठक

मुक्ताईनगर पो स्टे चे पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी घेतली डीजे आणि बँड चालक- मालकांची बैठक

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे):- दिनांक 17 /2023 सविस्तर वृत्त असे की डीजे चालक-मालक यांना अनेक वेळेस सूचना देऊनही मिरवणुकांमध्ये अथवा लग्न समारंभांमध्ये आयोजकांकरवी डीजे च्या आवाजाचे तसेच वेळे संदर्भात जी नियमा वली ठरवून दिलेली आहे त्याचे सर्रास उल्लंघन होताना पाहावयास मिळते त्याची दखल घेत मुक्ताईनगरचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी डीजे बँड चालक-मालक यांना तातडीची बैठक बोलावून डीजे बँड चालक-मालक यांना आवाजाची मर्यादा किती डेसिबल असावी आणि किती वेळ दिलेले आहे त्या संदर्भात माहिती दिली डीजेच्या मोठ्या आवाजाने हृदयविकाराच्या रुग्णांना याचा फार त्रास होतो परिणामी यामध्ये काही लोकांचा मृत्यू सुद्धा ओढवतो त्यामुळे आपण आवाजावर मर्यादा राखावी तसेच प्रक्षोभक किंवा कुणाच्या भावना दुखावतील अशा आशयाची गाणे न वाजवण्याच्या सूचना दिल्या यावेळी त्यांच्यासमवेत मुक्ताईनगर पो स्टे चे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button