बुलढाणामहाराष्ट्र

यशवंत पंचायत राज अभियान सन २०२२-२३ पंचायत समिती शेगाव अमरावती विभागात प्रथम

यशवंत पंचायत राज अभियान सन २०२२-२३ पंचायत समिती शेगाव अमरावती विभागात प्रथम
*शेगाव तालुका सरपंच संघटनेकडुन गट विकास अधिकारी यांचा सत्कार

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे//

शेगांव /प्रतिनिधी। महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग यांचा शासन निर्णय क्रमांक झेपीए २०२२/प्र.क्र. ११२ / परा-१ दिनांक ३ जानेवारी २०२३ नुसार पंचायत राज संस्थाच्या कामगीरी नुसार त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सन २००५-०६ या आर्थिक वर्षापासुन विभाग व राज्य अशा दोन्ही स्तरावर यशवंत पंचायत राज अभियान ही पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे.

त्यानुसार पंचायत समिती शेगाव कार्यालयाने सन २०२२-२३ अंतर्गत सन २०२१-२२ च्या साध्यावर आधारित यशवंत पंचायत राज अभियानामध्ये सहभाग घेऊन बुलडाणा जिल्हातील तेरा पंचायत समिती मधुन प्रथम क्रमांकाने गुणांकन प्राप्त झाल्याने पंचायत समिती शेगाव कार्यालयाची विभागस्तरावरील मुल्यांकन समितीने कडुन दिनांक २८/०२/२०२३ रोजी तपासणी करण्यात. आली.

महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग : झेपीए २०२२/प्र.क्र.११२/पंरा-१ दिनांक १२/०६/२०२३ नुसार यशवंत पंचायत राज अभियान सन २०२२-२३ राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना विभाग व राज्यस्तरावरील पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यानुसार विभागस्तरीय समितीने पुरस्कारासाठी शिफारस केलेल्या पंचायत समित्यांमधुन राज्यस्तरीय मुल्यांकन समितीने प्रथम क्रमांकासाठी अत्युत्कृष्ट पंचायत समिती म्हणुन अमरावती विभागातुन पंचायत समिती शेगावला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यानिमीत्तने शेगाव तालुका सरपंच संघटना व सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा शिवसेनेचे तालुका प्रमुख रामेश्वर थारकर यांनी पंचायत समिती शेगावचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी मा. श्री. सतिषजी देशमुख यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सत्कारा प्रसंगी श्री. रामहरी बोरसे, सरपंच ग्रापं सांगवा, श्री योगेश पिसे, संरपंच ग्रा.पं.पाडसुळ, श्री दिपक दामोधर, सरपंच ग्रापं मोरगाव डी, श्री.सदानंद पुंडकर, सरपंच ग्रापं येऊलखेड, समाधान खंडेराव कालखेड तसेच शेगाव तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेविका तसेच पंचायत समिती शेगाव कार्यालयातील विस्तार अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button