महाराष्ट्रविदर्भ

मालेगांवात अवैध देशी दारू व गावठी दारु बंद करण्यात यावी .

मालेगांवात अवैध देशी दारू व गावठी दारु बंद करण्यात यावी .

जिजाऊ ब्रिगेडचा मालेगावात एल्गार

ठाणेदार व तहसीलदारांना दिले लेखी निवेदन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव-: मालेगाव तालुक्यामध्ये तसेच मालेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी दारू तसेच अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असुन त्यावर बंदी घालण्यात यावी . याकरीता मालेगाव तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने 15 जून रोजी पोलीस स्टेशन मालेगाव तसेच तहसीलदार मालेगाव यांना लेखी निवेदन देऊन दोषीविरूध्द कडक कारवाई करण्यात यावी . अशी मागणी केली आहे .
मालेगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गावठी दारू काढली जाते तसेच देशी दारू अवैध रीतीने विकल्या जाते . ही दारू विदेशी दारूपेक्षा कमी भावात व सहज मिळत असल्याने अल्पवयीन मुले व नागरिक मोठ्या संख्येने दारूच्या आहारी जात आहेत. त्यामुळे नवीन पिढी सह अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. दारूच्या व्यसनामुळे अगदी कमी वयामध्येच अनेकांना विविध प्रकारचे आजार होत असून अनेकांचे अकाली निधन झाल्याच्या घटना घडत आहेत . दारुडे पती आपल्या पत्नीचा दारू पिऊन प्रचंड शारीरिक व मानसिक छळ करत असून अनेक महिलांनी नवऱ्याच्या त्रासांपाई आत्महत्या केल्याच्या घटना सुद्धा घडत आहेत. त्यामुळे त्यांची लहान लहान मुले उघड्यावर आली असून त्यांचा कोणी वाली राहिला नाही. दारूमुळे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे .त्यामुळे ग्रामीण भागात व शहरी भागात मोठ्या प्रमाणात विक्री होत असलेली गावठी दारू तसेच अवैध देशी दारू त्वरित बंद करण्यात यावी. अन्यथा मालेगाव तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सदर निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सदर निवेदन मालेगांव पोलीस स्टेशनच्या ए पीआय वाघ मॅडम तसेच तहसीलदार मा . पुंडे यांना सदर निवेदन देण्यात आले असून त्याची प्रतिलिपी माननीय आमदार अमित भाऊ झनक यांना सुद्धा देण्यात आली आहे. निवेदनावर शिवमती कामिनी वसंतराव अवचार ,शारदा दत्तात्रय कावरखे ,भारती सुधीर लादे ,कल्पना साहेबराव कढणे, संध्या भरत आव्हाळे ,विद्युलताअनंत गायकवाड, गीता जगन्नाथ रंजवे, रेखा अनिल गवळी ,विद्या प्रवीण पाटील, रूपाली प्रशांत लादे, नंदा पांडुरंग भुतेकर ,रेखा मोहन वानखेडे, आशा बाबुराव इंगोले ,नंदिनी गणेश कुटे , वंदना अशोक कुटे यांची यावेळी उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button