बुलढाणामहाराष्ट्र

सोने चांदी विक्रेत्यांना गंडवणारा गुन्हेगार

सोने चांदी विक्रेत्यांना गंडवणारा गुन्हेगार गजाआडस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर दिनांक 14/06/2023 रोजी रात्री 09/00 वा. सुमारास आरोपी विठ्ठल भालचंद्र सानप वय 52 वर्ष राहणार प्लॉट नंबर 72 राजीव गांधी नगर सिडको औरंगाबाद याने शेगांव येथील नक्षत्र ज्वेलर्स शेगावचे सराफा व्यवसाका कडून सोन्याचे पेंडल खरेदी केले व गहूमनी खरेदी करायचे आहे असे म्हणाला. त्यानंतर सोन्याचे 46 गहू मनीचे वजन घ्यायचे आहे असे सराफा व्यावसायिकाला म्हणाला, मोड म्हणून आपल्या जवळील काही दागिने त्यांना दिली परंतु सदर दागिने नकली असल्याचे सराफा व्यावसायिकाचे लक्षात येऊन त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी शेगांव शहर पोलिसांना माहिती दिली. वरून पोलीसानी त्यास पकडून त्याचेंजवळून नगदी 88,080/- रु. व काही पांढऱ्या व पिवळ्या धातूचे वस्तू दागिने व बनावट चांदी चे दागींने ईतर साहित्य जप्त करून ताब्यात घेतले व याबाबत सराफा व्यावसायिक निलेश शांताराम गणोरकर यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून अपराध क्र. 328 /23 कलम 420,511 भा.द.वी. चा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा पुढील तपास पो. उप. नि. आशिष गंद्रे करीत आहे. या आरोपी ची औरंगाबाद बीड व जालना यथे गुन्हेगारी पूर्वपार्श्वभूमी असल्याची माहिती मिळाली असून त्याला पकडल्याने सराफा व्यवसायिकांचे फसवणुकीचे बरेच गुन्ह्याची उकल होण्याची संभावना व्यक्त केली जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button