बुलढाणामहाराष्ट्र

शेगावं मंदिर परिसरात नववधू बेपत्ता झाली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगाव आठवड्यापुर्वीच रितीरिवाजाने घाटात लग्न लागले, दोन्ही घरची सत्यनारायणाची पूजा झाली. दोघेही जोडप्याने शेगाव येथे दर्शनासाठी आल्यावर पत्ती बाथरूममध्ये जाताच बायको गायब झाल्याची घटना ११ जून रोजी दुपारी ४ वाजता तेच्या नवविवाहित पतीने शेगाव शहर पोलिसात केली आहे. फिर्यादी उमेश कमलनारायण जयस्वाल ३४ वर्ष व्यवसास शेतीकाम रा. हिवरखेड ता तेल्हारा जि अकोला यांचे उषा रमेश पंडित (वय- २७) रा. आंबेडकर नगर, जोगेश्वरी पो बाबुज ता गंगापुर जि औरंगाबाद हिचे सोबत ७ जून रोजी आर्य समाज आकोट ता. आकोट जि. अकोला येथे रीतिरिवाजाने लग्न झाले. लग्नानंतर दोघेही ११ जून रोजी दुपारी ३ वाजता शेगाव येथे दर्शनासाठी आले होते. त्या दरम्यान दुपारी ४

वाजताच्या सुमारास शेगाव मंदीरातील बाथरूम करण्याकरीता गेलो परत आलो तेव्हा त्यांची पत्नी त्या ठिकाणी दिसून आली नाही. माझा मोबाईल व तिच्याकडे असलेला मोबाईल सुद्धा बंद आहे. मी माझी पत्नी हिचा मंदीरात व मंदीर पाकीगमध्ये शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तसेच नातेवाइक यांचे कड़े फोन लावुन चौकशी केली असता शोध लागला नाही. तिचे वर्णन केस काळे रंगाचे रंग सावळा, उंची पाच फुट बांधा मध्यम, अंगात आकाशी कलरची साडी, पायात लाल रंगाची चप्पल, डाव्या हाताच्या खांदयावर ट्याटु, उजव्या हातावर ट्याटु गोंधलेले आहे. याप्रकरणी पतीच्या तोंडी रिपोर्ट वरून शेगाव शहर पोलिसांनी नवविवाहित महिला हरविल्याची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button