बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी, नव्या चेहऱ्याला संधी..

मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी, नव्या चेहऱ्याला संधी.. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसकडून मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. भाई जगताप यांच्याजागी वर्षा गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल यांनी याबाबतची घोषणा केली आहे. भाई जगताप यांची मुंबई अध्यक्षपदावरून उचलबांगडी का करण्यात आली? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबईसोबतच काँग्रेसने गुजरात आणि पुदुच्चेरीच्या प्रदेशाध्यक्षांनाही डच्चू देत नव्या नेत्यांना संधी दिली आहे. मागच्या वर्षी जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाई जगताप काँग्रेसच्या तिकीटावर रिंगणात उतरले होते. काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांना पहिल्या पसंतीची तर भाई जगताप यांना दुसऱ्या पसंतीची मतं द्यायला सांगण्यात आलं होतं. दुसऱ्या पसंतीची मतं द्यायला सांगितल्यानंतरही भाई जगताप यांनी ही निवडणूक जिंकली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button