बेलखेडच्या पद्मावती काशीराम टिकार व जोत्स्ना गोमासे यानां…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा. दि1. 2023 24 या वर्षाकरिता महिला व बाल विकास विभागामार्फत दिल्या जाणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार या वर्षी बेलखेडच्या पद्मावती (टिकार) कोल्हे व ज्योत्स्ना गोमासे यांना दिनांक 31 5 2023 ला ग्रामपंचायत तर्फे वितरित करण्यात आला.
हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागा मार्फत या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन महिलांना ग्रामपंचायत तर्फे वितरण करण्यात येतो. तेल्हारा तालुक्यातील बेलखेड गावातील पद्मावती कोल्हे (टीकार) व जोत्स्ना गोमासे यांना दिनांक 31 5 2023 ला ग्रामपंचायत बेलखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हि बाब बेलखेड वासीयांसाठी गौरवाची बाब आहे .दरवर्षी अहिल्यादेवी होळकर जयंती दिनानिमित्त याच दिवशी या पुरस्काराचे वितरण करण्याचे आदेश महिला व बालविकास विभागाने दिले आहे या पुरस्काराचे स्वरूप :- सन्मानपत्र, सन्मानचिन्ह ,शाल व श्रीफळ आणि 500 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्कार वितरण प्रसंगी बेलखेड सरपंच रत्नामाला वरठे ,उपसरपंचट नंदकिशोर निमकर्डे ,सदस्य अरविंद वरठे, रुख्मा टोहरे ,गोपाळ टोहरे, सुचिता उमाळे ,नर्मदा गोरे ,सीमा परमाळे .जोत्स्ना गोमासे ,एस आर मोटघरे ग्रामसेवक ,सुनील आढाव लिपिक ,गजानन सातव कर्मचारी ,आणि निलेश आढाव संगणक सहाय्यक ,आदींची उपस्थिती



