लिलावती कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दातिवली चा इयत्ता 12 वी चा निकाल 91.17%

दिवा – ( सचिन शेलवले )
शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचालित लिलावती कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दातिवली 12 वी फेब्रुवारी 2023 च्या परीक्षेचा निकाल 91.17%इतका लागला आहे.
त्यात कला शाखेचा निकाल 85.41% लागला असून प्रथम क्रमांक कुमारी बसवणकर समिक्षा दीपक 73% , द्वितीय क्रमांक कुमारी पाटील नितिशा संतोष 69.17% तर तृतीय क्रमांक कुमारी पाटील रिया भिमराव 67.33 % यांनी प्राप्त केला.
वाणिज्य शाखेचा निकाल 94.66% लागला असून प्रथम क्रमांक कुमारी बैकर स्नेहा रवींद्र 86.50%, द्वितीय क्रमांक कुमारी बांद्रे पूजा दत्ताराम 70.67% तर तृतीय क्रमांक कुमार बाईक सुरज कृष्णा 65.67% यांनी प्राप्त केला आहे.
विज्ञान शाखेचा निकाल 92.30% लागला असून प्रथम क्रमांक कुमार खोत प्रभंजन सुरेश 82.83% याने प्राप्त केला तर द्वितीय क्रमांक मोरे अनिशा राजेश 58.17% तृतीय क्रमांक कुमारी भालेराव पायल विश्वास 55.17% यांनी प्राप्त केला आहे.
सर्व गुणवान विद्यार्थ्यांचे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्ष माननीय श्रीमती लिलावती म्हात्रे तसेच संस्थापक श्री. साईनाथ म्हात्रे सर सौ. केतकी म्हात्रे ,सौ. गीता म्हात्रे, श्री. दिनेश म्हात्रे श्री. शिवदत्त म्हात्रे यांनी अभिनंदन केले व सर्व प्राध्यापक व मुख्याध्यापक यांचे कौतुक केले.
याप्रसंगी संस्थेच्या संचालक मंडळाने यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व आयुष्यात तुमच्या आवडीप्रमाणे उत्तम करिअर निवडून एक सुसंस्कृत नागरिक बना अशा शुभेच्छा दिल्या.



