बुलढाणा

म.ज्यो.फु.ज.आ.योजनेअंतर्गतसेच रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा विजय घोडे तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि. 26 महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तसेच रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटल अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने तेल्हारा ग्रामीण रुग्णालय जिल्हा अकोला येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर उद्या दिनांक 27 5 2023 शनिवार रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत तज्ञ डॉक्टरांकडून पुढील आजारांवर रुग्णांची तपासणी करण्यात येईल:-1) तोंडातून रक्त येणे, तोंडातील दोन ते तीन आठवडे पेक्षा न भरणारी जखम, घास गिळताना वेदना होणे ,वजन कमी होणे ,कर्कश आवाज येणे, तोंडातून दुर्गंध येणे ,हिरड्यातून रक्त येणे ,ई.दातांचे संबंधित आजार .2) संबंध ठेवल्यानंतर वेदना होणे ,संबंध ठेवल्यानंतर रक्तस्त्राव होणे ,लघवी करताना वेदना होणे/दुर्गंध येणे ,मोनोपोज (रजोनिवृत्ती) नंतर होणारा रक्तस्त्राव, रक्तस्त्रावासह डिस्चार्ज. 3) स्तनामध्ये गुठळ्या किंवा गाठ होणे ,स्तनातून रक्तस्त्राव (पांढरे पाणी बाहेर पडणे) स्तनाच्या त्वचेमधील बदल होणे ,काखेत येणारी गाठ, स्तनाच्या आकारातील आकस्मित बदल होणे ई.
वरील लक्षणे ही कर्करोगाची असू शकतात तसेच रुग्ण तपासणी दरम्यान कर्करोगाचे निदान झाल्यास पुढील उपचार रिलायन्स कॅन्सर केअर हॉस्पिटल अकोला येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.तसेच वरील लक्षण असणाऱ्या जास्तीत जास्त रुग्णांनी शिबिरात येऊन तपासणी करून घ्यावी तसेच कर्करोगाने आजारी असलेल्या रुग्णांनीही या शिबिरामध्ये यावे आणि या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.दिनेश पवार कर्करोग तज्ञ. रिलायन्स हॉस्पिटल कॅन्सर केअर अकोला,तसेच रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button