मतदार संघ सुजलाम सुफलाम केल्याशिवाय विकासाचे चक्र थांबणार नाही –

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आमदार राजेश पंडितराव एकडे (धानोरा येथे ५ कोटी ७० लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भुमीपुजन संपन्न ) नांदुरा(प्रतीनीधी) आ. राजेश एकडे यांचा मलकापूर विधानसभा मतदार संघात विकास कामाचा झंजावात सुरू आहे. त्यांनी करोडो रुपयांचा निधी खेचून आणीत नांदुरा व मलकापुर तालुक्यातील विविध विकासकामे मार्गी लावले आहे. 20 मे रोजी धानोरा येथे पुर संरक्षण भिंत बांधणे रुपये 90 लक्ष तर द्वारयुक्त बंधारा बांधणे रुपये ४ कोटी 80 लाख एकूण 5 कोटी 70 लक्ष रुपयांच्या या विकास कामाचे भूमिपूजन आ. राजेश एकडे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी आ. एकडे यांनी नांदुरा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द असल्याचे सांगत मतदार संघाद्वारयुक्त बंधारे बांधून सिंचनाच्या सोयी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न असून याद्वारे मतदार संघ सुजलाम सुफलाम होईल व बळीराजाला दिलासा मिळेल त्यामुळे संपूर्ण मतदारसंघ सुजलाम सुफलाम होईपर्यंत विकासाचे चक्र थांबणार नाही. आपण निमगाव व भुईशिंगा परिसरात चार द्वारयुक्त बंधारे बांधले त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीची पाणी पातळी वाढली व शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई मिटली व त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत झाली अशाच प्रकारे या बंधाऱ्याद्वारे धानोरा शिवार सुद्धा सुजलाम सुफलाम होणार व हे विकासाचे चक्र आपण निरंतर सुरू ठेवू अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन गजानन लक्ष्मण वनारे , सरपंच ग्रामपंचायत धानोरा , प्रदीप सुरेश पाटील उपसरपंच ग्रामपंचायत धानोर हे होते. या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी प्रमुख उपस्थीती श्री भगवान धांडे (अध्यक्ष नांदुरा तालुका कॉंग्रेस कमेटी तथा सभापती कृ.उ.बा.स.नांदुरा) डॉ. प्रदिप हेलगे (उपसभापती कृ.उ.बा.स. नादुरा ) श्री. पदमराव पाटील (मा.मुख्य प्रशासक कृउ बास. नादुरा) श्री. वसंतराव भोजने (जिल्हा प्रमुख शिवसेना उ.बा.ठा.), श्री मोहनराव पाटील (जिल्हा उपाध्यक्ष रा.कॉ. पार्टी), विलासराव पाटील मा.सभापती तथा विद्यमान संचालक कृ.उ.बा.स. श्री. निलेश पाउलझगडे (सरचिटणीस जिल्हा कॉंग्रेस कमेटी) श्री. संजय चोपडे (तालुका अध्यक्ष रा. काँग्रेस पार्टी नांदुरा) श्री ईश्वर पांडव (तालुका प्रमुख शिवसेना उ. बा. ठा.) सौ. आशाताई गोंड (जिल्हा कॉंग्रेस कमेटी सदस्य बुलडाणा) श्री. वा.स. पाटील (जिल्हा उपाध्यक्ष रॉ का.पा.) श्री. जनार्दन दांडगे माजी अध्यक्ष नांदुरा तालुका काँग्रेस कमिटी, श्री. पुरुषोत्तम झालटे (संचालक कृ. उ. बा. स ) संदिप बोचरे (संचालक कृ.उ.मा.स.) श्री. संदिप भगत (संचालक कृ.उ.बा.स.) श्री. प्रविण भिडे (संचालक कृ.उ.बा.स.) श्रीभानुदास तितरे (संचालक कृ.उ.बा.स.) श्री. मोहन गावडे (संचालक कृ.उ.बा.स.) श्री. सुनिल भोजने शिवसेना नेते (उ. बा. ठा.) श्री. बंटी वनारे अध्यक्ष मलकापूर विधानसभा युवक काँग्रेस , श्री. पांडुरंग तायडे (काँग्रेस नेते), श्री. समाधान पाटील , श्री. दिलीप वक्टे , श्री. हाजी शेख गप्फार शेख गणी , श्री. सद्दाम खान कराम खाँन यांची होती या भूमिपूजन सोहळ्याला धानोरा गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.



