बुलढाणामहाराष्ट्र

शिवसेना बुलढाणा जिल्हा उपप्रमुख राजू पाटील मिरगे,

*आणि शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांचे शेगाव तालुक्यातील विविध विकास कामांसंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच खासदार प्रतापराव जाधव यांना निवेदन*स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा प्रतिनिधिऋषिकेश देठे शेगाव तालुक्यातील भोनगाव येथील ब्रिटिश कालीन इमारत बांधण्यासाठी मंजुरात देऊन निधी उपलब्ध करून देण्याकरिता शिवसेनेचे शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील तसेच बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव जाधव यांना निवेदन देण्यात आले , याहिअगोदर रामा पाटील थारकर यांचा सदर आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हास्तरावर सातत्याने पाठपुरावा चालूच आहे आणि सदर इमारत पाडण्यासाठी परवानगी आणि निधी सुद्धा शासनाने मंजूर केला आहे यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही सुद्धा दिली तसेच या भेटीदरम्यान तालुक्यातील आडसुळ ते शेगाव रस्ता डांबरीकरण करण्याकरिता मंजूरात देऊन निधी उपलब्ध, तसेच पहुरपूर्णा ते खातखेड मध्ये असलेल्या जांभीचा नाला वर पुल बांधकाम कामाला मंजुरात देऊन निधी उपलब्ध करून देण्यात बाबतचे निवेदन देण्यात आले आणि सदर विकास कामांबाबत पालकमंत्री मंजुरात देऊन निधी उपलब्ध करून देण्याकरिता कटिबद्ध आहे अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली . यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू पाटील मिरगे तसेच रामा पाटील थारकर उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button