बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगाव शहर मध्ये कचऱ्याचे ढिगार नगरपालिका अधिकारी घेते आहे झोपेचे सोंग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

मुंबईच्या वाऱ्या कमी करा व जनसामान्याकडे लक्ष द्या – शेतकरी क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष गजानन बिल्लेवार यांचा आरोप*

राज्यात चालू असलेल्या अवकाळी सततच्या पावसामुळे पावसाच्या थेमानाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेल आहे. तसाच अवकाळी पावसाचा तडाखा शेगाव तालुक्यामध्ये ही पाहायला मिळाला. शेगाव येथील शहरी विभागांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहे.अवकाळी पाऊस आणि कचऱ्याचे ढीग याच्यात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे.यांच्याकडे सीओ मॅडम जयश्री काटकर यांचे सारासर दुर्लक्ष करत आहे. वास्तविकता कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम हे आरोग्य खात्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आहे परंतु याच अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले असता नागरिकांच्या जीवाशी हा खेळ होत आहे याला जबाबदार आहे तरी कोण ? असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे. परंतु याउलट तोच कचऱ्याचा ढिग नागरिकांकडून उचलला गेला. हे मोठे प्रशासनाचे दुर्लक्ष समजावे लागेल. कचऱ्याचा ढीग जर उचलला गेला नाही तर सिईओ मॅडम जयश्री काटकर यांच्या दारासमोर घेऊन हा कचरा मी टाकणार असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गजानन बिल्हेवाल्यांनी केला.आणि तसेच जबाबदार आरोग्य खात्यातील अधिकारी असून त्यांच्या घरात हा खर्च नेऊन टाकील असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.. सीईओ जयश्री काटकर मॅडम मुंबईच्या वाऱ्या जरा कमी कराव्या.व जनसामान्याकडे लक्ष द्यावे. तुम्ही जनतेसाठी आहात जनता तुमच्यासाठी नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.प्रशासनाने तातडीने याच्यावर लक्ष देऊन कचऱ्याची विल्हेवाट लावावी. अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button