महाराष्ट्रविदर्भ

*तेल्हारा येथे उमेश म्हसाये सरांच्या  “क्रांती समर कॅम्प” ला उत्स्फूर्त प्रतिसाद* 

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा ता प्रतिनिधी

महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना तथा नटराज आर्ट अकॅडमी तेल्हारा व श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमाने “क्रांती समर कॅम्प” चे आयोजन करण्यात आले असून  दिनांक 16 एप्रिल पासून या कॅम्पला सुरुवात झाली आहे 20 दिवसांकरिता या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्प ला उस्फुर्त-रित्या प्रतिसाद मिळत असून त्यामध्ये  वर्ष 4 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या   कलागुणांना वाव मिळावी तसेच ,सर्वांगीन विकास व्हावा या हेतुने स्टेज डेरिंग, चित्रकला,गीत गायन, नृत्यकला, नाट्यकला,योगा पिरॅमिड, शिल्पकला, धनुर्विद्या, नेमबाजी व विविध कलांनी संपन्न असे बाल संस्कार शिबिर आहे. या शिबीराला क्रांती समर कॅम्प असे नाव देण्यात आले आहे.  कार्यक्रमाचे मुख्य आयोजक उमेश दयाराम म्हसाये (कलाशिक्षक) हे आहे.तसेच या क्रांती  समर कॅम्प ला  नियंत्रण म्हणून  मार्गदर्शिका मा. पद्मावती टिकार मॅडम, तसेच प्रशिक्षक :– कु प्रणिता सदाफडे, कु. वैष्णवी सुषिर, श्री. सतीश सावरकर श्री.मनोज अनेरकर,योगेश ठाकरे, कुमारी धनश्री जायले  यांचे मार्गदर्शन लाभले आहे  या संधीचा सर्वांनी फायदा करून घ्यावा.असे आवाहन श्री उमेश दयाराम म्हसाये सर यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button