आई महोत्सवात रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाउनटाऊन तर्फे माननीय श्रीमती लिलावती म्हात्रे यांचा भव्य सत्कार!

दिवा – रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊन टाउन तर्फे मा. श्रीमती लिलावती म्हात्रे यांचा आई महोत्सवात आदर्श आई २०२३ हा पुरस्कार देऊन दि.15/04/2023 रोजी डोंबिवली येथे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र देऊन समारंभ पूर्वक दिमाखदार सोहळ्यात भव्य सत्कार करण्यात आला.
मा. लीलावती म्हात्रे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शैक्षणिक कार्यासाठी वाहून घेतलेले आहे. शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळाची सन 1993 साली स्थापना करून संस्थेच्या माध्यमातून त्या दातिवली दिवा येथे पूर्व प्राथमिक, प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा चालवीत आहेत केवळ आपल्या कुटुंबासाठी फक्त जीवन न जगता शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी हे फार मोठे कार्य कष्टाने सुरू केलेले आहे. एवढ्यावरच त्या थांबलेल्या नाहीत तर वय 65 वर्षे असतानासुद्धा महाविद्यालयीन शिक्षण देण्यांसाठी त्यांची धडपड सुरू आहे .आज या शाळेत सुमारे 4500 विद्यार्थी शिक्षण घेत असून सुमारे 100 शिक्षक कार्यरत आहेत .त्या स्वतः जास्त शिकलेल्या नाही परंतु समाजासाठी ,गावासाठी , परिसरासाठी ,राजकारणापेक्षा आपण काहीतरी वेगळे केले पाहिजे ही संकल्पना मनाशी ठेवून त्यांनी शिक्षणाचे पवित्र कार्य सुरू केलेले आहे व त्यात त्या यशस्वी झालेल्या आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब डोंबिवली डाऊन टाऊन तर्फे त्यांच्या आई महोत्सवात डोंबिवली येथे आदर्श आई 2023 हा पुरस्कार देऊन रोटरी अध्यक्ष ॲनी बिजॉय, सेक्रेटरी निकिता जॉन, प्रोजेक्ट चेअरमन योगेश जांभेरे व इतर मान्यवरांतर्फे त्यांच्या भव्य सत्कार करण्यात आला. त्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी शेकडो शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल शिक्षक , विद्यार्थी, पालक वर्ग व ग्रामस्थांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो व असेच आणखी उत्कर्षवृत्त कार्य त्यांच्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.



