महाराष्ट्रमुक्ताईनगर

दोन भाऊ एक ताई तरी सर्विस रोडवरील खड्ड्यावर कोणाचीही लक्ष नाही

मुक्ताईनगर प्रतिनिधी – धनराज मांडवकर

मुक्ताईनगर शहरातील बोदवड चौफुली जवळ डॉक्टर जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूल जवळ रस्त्यात म्हणजे सर्विस रोडला मोठा खड्डा आहे तरी या खड्ड्याकडे बऱ्याच महिन्यापासून कोणाचीही लक्ष गेले नाही या खड्ड्यामुळे बरेच वाहनधारक जसे मोटरसायकल चार चाकी या खड्ड्यामुळे अपघाताला बळी पडतात त्यामुळे त्यांचे बरेच नुकसान होत आहे मुक्ताईनगर शहरांमध्ये बरेच राजनेता सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकारी वर्ग आहेत तरीही सर्विस रोडवरील या खड्ड्याकडे अद्यापही कोणी लक्ष दिलेले नाही तरी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या खड्ड्याकडे लक्ष देण्याची मागणी जनता करीत आहे विशेष म्हणजे हा जो सर्विस रोड आहे तो मुक्ताईनगर शहराला आंतरराष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ला जोडतो त्या रस्त्याने म्हणजे सर्विस रोडने बरेच वाहनधारक इजा करतात परंतु रात्रीच्या वेळेस काही लोकांचे खड्ड्यावर लक्ष राहत नाही आणि ते खड्ड्यात जाऊन पडतात व त्यांना शारीरिक इजा होते जनता प्रश्न करीत आहे की आतापर्यंत या खड्ड्याकडे एखाद्या राजकारणी किंवा सामाजिक कार्यकर्ता किंवा सार्वजनिक विभाग अधिकारी यांचे या खड्ड्याकडे लक्ष गेले असेल तर खड्डा का दुरुस्त केल्या जात नाही किंवा सार्वजनिक बांधकामाच्या नजरेत हा खड्डा पडलाच नाही हा प्रश्न जनता करीत आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डा रिपेअर करून जनतेला सहकार्य करावे अशी जनता मागणी करीत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button