पूर्णा नदी काठच्या गावांनासतर्कतेचा इशारा 20/04/2023रोजी येणार पूर्णा नदीला पाणी

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
पूर्णा मध्यम प्रकल्प ता, चांदुर बाजार जि अमरावती प्रकल्पाच्या यांत्रिकी कामाकरिता पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्याबाबतची सूचना कार्यकारी अभियंता मध्यम व लघु पाटबंधारे विभागाचेअचलपुर यांचे पत्र जा, क्र,890/मवलपावि/ताशा-4पूर्णा/2023दिनांक31/3/2023प्राप्त दिनांक10/4/2023नुसार पूर्णा मध्यम प्रकल्पाच्या द्वाराचे प्रकल्पाच्या सुरक्षतेच्या दृष्टीने देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने प्रकल्पाच्या यांत्रिकी कामास दिनांक1/5/2023पासून सुरवात होत असल्याने प्रकल्पातील पाणी पातळी Creast Leval पर्यन्त कमी करण्यासाठी प्रकल्पातुन दिनांक20/4/2023रोजी सकाळी11वाजता पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे, सदर पाण्याचा निसर्ग हा दिनांक20/4/2023पासून दिनांक27/4/2023पर्यन्त राहणार आहे करिता पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे कुठल्याही प्रकारची जीवित अथवा वित्त हानी होऊ नये याकरिता सदर कालावधीत पूर्णा नदीपात्रात सुरू असलेल्या विविध कामाच्या यंत्रणांना तसेच नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याबाबत अवगत करण्याबाबत चे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बुलढाणा यांनी शेगांव,मलकापूर, नांदुरा, जळगांव जामोद येथिल तहसीलदार यांना दिले आहेत
तरी पूर्णा नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आव्हाहन तालुका स्तरावरून करण्यात येत आहे।



