महाराष्ट्रविदर्भसामाजिक

सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ खामगावात सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण….. जी.डी. रोकडे बुलढाणा प्रतिनिधी. खामगाव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या समर्थनार्थ खामगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काल 29 ऑक्टोबर पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेलाअसून राज्यभर व्यापक लढा लढला जात आहे. मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या या मराठा आरक्षणाच्या लढ्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सरकारने चाळीस दिवसाचा वेळ घेऊनही मराठा आरक्षण संदर्भात कुठलाही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला राज्यभरात प्रतिसाद मिळत असून मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ खामगाव सकल मराठा समाजाच्या वतीने येथील टावर चौकात काल 29 ऑक्टोबर पासून साखळीवरून सुरू करण्यात आले आहे सकाळी अकरा वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन पुष्पगुच्छ अर्पण करून या साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. माजी आमदार दिलीप कुमार सानंदा उपस्थित होते .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button