महाराष्ट्रविदर्भशेती

पोलीसांच्या नाकर्ते पणाला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको…

अकोला -हैद्राबाद मार्गा वरील वाहतूक दिड तास ठप्प… शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळून केला संताप व्यक्वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड मालेगाव -: शेती उपयोगी साहित्य चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेलेल्या शेतकऱ्यांना समाधान कारक वागणूक न मिळाल्याच्या निषेधार्थ मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्यांनी आज सोमवार दिनांक १० एप्रील रोजी अकोला- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा फाटा नजीक तब्बल दोन तास रास्ता रोको केला सोबतच रस्त्यावर टायर जाळून पोलिस प्रशासना विरुद्ध रोष व्यक्त केला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे मालेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे ब्राह्मणवाडा येथील एकनाथ हरिभाऊ नागरे यांच्या सह गावातील इतर चार शेतकऱ्यांच्या घरा समोरील शेती उपयोगी सहा मोटार पंप संच चोरीला गेल्याची घटना ९ एप्रीलच्या रात्री दरम्यान घडली सदरहू घटनेची फिर्याद देण्या साठी ब्राह्मणवाडा येथील एकनाथ हरिभाऊ नागरे व विकास विश्वनाथ नागरे यांच्या सह इतर काही शेतकरी १० एप्रील रोजी सकाळीच मालेगाव पोलिस स्टेशनला गेले असता पोलिस प्रशासनां कडून अपेक्षित सहकार्य व समाधान कारक वागणूक न मिळाल्यानेच रिधोरा फाटा नजीक रस्त्यावर टायर जाळून चक्का जाम केल्याची प्रतिक्रिया ब्राह्मणवाडा येथील एकनाथ हरिभाऊ नागरे यांनी रास्ता रोको दरम्यान प्रस्तुत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केली रस्त्यावर टायर जाळून शेतकरी वाहनां समोर उभे ठाकल्याने जवळपास दिड तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला घटनेची माहिती मिळाल्या नंतर तब्बल तासाभर विलंबाने दाखल झालेल्या पोलीसांनी आंदोलकांना धक्का बुक्की करत ताब्यात घेतले यावेळी संतापलेल्या पोलिसांनी घटनेचे छायाचित्रण करणा-या नागरीकांचे मोबाईल हिसकावून ताब्यात घेतल्याने पोलीसांप्रती जनतेतून संताप व्यक्त केला गेला सदरहू प्रकरणी आंदोलका विरुद्ध कारवाईची प्रक्रिया मालेगाव पोलिसां कडून सुरु होती…. बॉक्स मध्ये…सदरहु घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले *पत्रकार यशवंत हिवराळे* यांना छायाचित्रण करण्यास मज्जाव करुन पोलीस उपनिरीक्षक तडसे यांनी उध्दटपणाची वागणुक दिली या घटनेचा मालेगाव तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button