गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मारहाणीमुळे विवाहितेचा गर्भपात

पतीसह ८ जणांवर गुन्हा दाखल : जवळा महागाव येथील घटना( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) कनारखेड : पत्नीच्या पोटातील गर्भ माझा नाही, असे म्हणत पतीने पत्नीच्या पोटात लाथ मारून बेदम मारहाण केली. तसेच सासरे व नणंदसह शेजाऱ्यांनी त्यास मदत केली. त्यामुळे विवाहितेचा गर्भपात झाल्याची घटना २ एप्रिल रोजी शेगाव तालुक्यातील जवळा महागाव येथे घडली. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी ६ एप्रिल रोजी पतीसह ८ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला.याप्रकरणी जवळा महागाव, ह. मु. मिलिंदनगर, शेगाव येथे राहणारी मनीषा सुनील इंगळे (वय २९) हिचा जबाब नोंदवून शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे नापोकॉ मंगलसिंग सोळंके यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यामध्येतिने पतीसोबत पटत नसल्याने दिवाणी कोर्टात वाद सुरू आहे.२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता पती प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी सुनील सहदेव इंगळे याने, तुझ्या पोटातील गर्भ माझा नाही, असे म्हणून पत्नीशी वाद घालत पोटात लाथ मारली. सासरे सहदेव लक्ष्मण इंगळे, नणंद वंदना सावदेकर यांनी केस अधिकाऱ्यांच्या पकडून तिला मारहाण केली. तसेच ती घराबाहेर आली असता शेजारच्या पाच महिलांनीही तिला केस ओढून खाली पाडत मारहाण केली.तिची आई वाद सोडवण्यास आली असता, तिलाही शिवीगाळ करून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी सर्व आरोपींनी दिली. मारहाणीमुळे विवाहितेच्या पोटात वेदना होत असल्याने तिला सईबाई मोटे दाखल केला आहे.उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.अकोला येथे उपचारासाठी पाठवले. अकोला येथे उपचारादरम्यान महिलेचा ५ महिन्यांचा गर्भपात झाला, या विवाहितेचा तोंडी जबाब व वैद्यकीय तपासणी अभिप्रायवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सुनील सहदेव इंगळे (पती), सहदेव लक्ष्मण इंगळे (सासरे), वंदना सावदेकर (नणंद), दुर्गा विनोद सावदेकर, नेहा जयपाल सावदेकर, भूमिका सावदेकर, लता सावदेकर, शालू राष्ट्रपाल सावदेकर (सर्व रा. जवळा, महागाव, ता. शेगाव) विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button