शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन आणि गायत्री हॉस्पिटल व मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2023 चे एमबीबीएस उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रमोद सौंदळे):- सविस्तर वृत्त असे की सामाजिक कार्यामध्ये नेहमीच कार्यरत असलेले त्याचबरोबर जिद्द चिकाटी आणि मेहनतीने जे विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करत असतात अशा विद्यार्थ्यांना पुढील त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा नवनवीन ध्येय त्यांनी गाठावे त्याचबरोबर त्यांच्या पाठोपाठ जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांनी सुद्धा या विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा या उद्देशाने शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन आणि गायत्री हॉस्पिटल व मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2023 चे एमबीबीएस उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ मुक्ताईनगर येथील जयस्वाल लॉन्स या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षक आमदार नाशिक विभाग माननीय श्री नानासाहेब बोरस्ते ,प्रमुख उपस्थिती संस्थापक अध्यक्ष प्रयास डिसीज रिव्हर्सल वेट लॉस अँड वेलनेस अमरावती माननीय डॉक्टर अविनाश सावत्री ,सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ तथा नाक कान घसा तज्ञ गायत्री हॉस्पिटल मुक्ताईनगर डॉक्टर एन जी मराठे, मुक्ताईनगर विधानसभा संघाचे विद्यमान आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांची उपस्थिती लाभलेली होती या कार्यक्रमात गायत्री मेडिकलचे संचालक सुनील उदे यांचे सुपुत्र डॉक्टर सागर एस उदे, तसेच डॉक्टर कुंदन बी धायडे, डॉक्टर मनीषा एस महाजन, डॉक्टर साक्षी जी टावरी, डॉक्टर शंतनू एम गावंडे, डॉक्टर निलग्रीव एल गायकवाड ,डॉक्टर जय नितीन जैन, डॉक्टर कृष्णा प्रल्हाद निळे .या सर्व गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला होता या कार्यक्रमाला लोकमतचे तालुका प्रतिनिधी विनायक वाडेकर सर, मागास विभाग काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष बी डी गवई ,जैन मेडिकलचे संचालक नितीन जैन ,कुसुमश्री नरसिंग चे डॉक्टर विक्रांत जयस्वाल ,डॉक्टर दिलीप तायडे, डॉक्टर मनोज महाजन, हरी महाजन एस एम कॉलेजचे व्हॉइस प्रिन्सिपल गायकवाड सर ,व तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर के ढोले सर आणि विनायक वाडेकर सर यांनी केले गुणवंत विद्यार्थ्यांचा मुक्ताईनगर तालुक्यातून कौतुक केले जात आहेत




