निवडणूकमहाराष्ट्रराजकीयविदर्भ

निवडणुकीत सहकार पॅनलला बहुमत मिळेल: पांडुरंगदादा पाटील

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगाव : शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली असून, त्या अनुषंगाने ४० वर्षापासून सत्तेत असलेल्या सहकार पॅनलची बैठक सहकार नेते पांडुरंगदादा पाटील, ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रघुनाथ पहुरकार हे होते. यावेळी माजी नगराध्यक्ष साहेबरावसेठ कलोरे, बळीराम गणेश पाटील, श्रीकृष्ण पहुरकार, रघुनाथ भारंबे, माजी नगरसेवक युवराज देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास फाटे, रा. कॉ. तालुकाध्यक्ष सुनिल गव्हांदे, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख दत्ता पाटील, घाटोळ आदींची उपस्थिती होती. सहकार पॅनल सत्तेत असताना मागील अडीच वर्षात शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असंख्य विकासाची कामे झाली. याउलट मागच्या टर्ममध्ये सुरूवातीचे अडीच वर्ष विरोधकांच्या हातात सत्ता असता त्यांनी मनमानी कारभार करून स्वतः बडतर्फ होण्याइतपत गैरकारभार केला. अश परिस्थितीत मतदारांनी सहकार पॅनलवरचा विश्वास दृढ झाला असून, येणाऱ्या निवडणूकीत सहकार पॅनलला बहूमत प्राप्त होईल असा दृढ विश्वास सहकार पॅनलचे नेते पांडुरंगदादा पाटील यांनी व्यक्त केला. या बैठकीला मंचकावर उपस्थित मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले. या बैठकीला सहकार पॅनलच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button