कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची काँग्रेसच्या व्ही.जे.एन.टी. विभागाच्या प्रदेश अध्यक्षा ॲड. पल्लवीताई रेणके यांनी राज्यपालांकडे केली मागणी

*कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची काँग्रेसच्या व्ही.जे.एन.टी. विभागाच्या प्रदेश अध्यक्षा ॲड. पल्लवीताई रेणके यांनी राज्यपालांकडे केली मागणी*
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या व्ही.जे.एन.टी. विभागाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. पल्लवीताई रेणके व सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष बादल गायकवाड यांनी मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेताताई संचेती यांच्याकडे राज्यपालांच्या नावे दिले. अब्दुल सत्तार हे राज्याचे कृषिमंत्री असून शेतकरी आत्महत्या टाळण्याच्या दृष्टीने ठोस व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित आहे. परंतू तसे न करता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी *शेतकरी आत्महत्या काही नवीन नाहीत, शेतकरी आत्महत्या करीतच असतात* अशा स्वरूपाचे निंदनीय व बेजबाबदार विधान करून शेतकरी वर्गाची एक प्रकारे क्रूर थट्टा केलेली आहे ज्याचा व्ही. जे. एन. टी. विभाग व सामाजिक न्याय विभागातर्फे तीव्र निषेध व्यक्त करून अब्दुल सत्तर यांना राज्याच्या कृषिमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशा आशयाचे निवेदन देऊन अब्दुल सत्तार यांनी कृषी मंत्री मंत्रिपदाचा त्वरित राजीनामा द्यावा अथवा राज्यपाल महोदयांनी त्यांना राजीनामा देण्यासाठी निर्देश देऊन त्यांना तातडीने पदावरून हटविण्यासाठी उचित कारवाई करण्याची मागणी राज्यपाल महोदायांकडे केली. निवेदनावर व्ही.जे.एन.टी. विभागाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अरविंद गोसावी, सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष बादल तुषार गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य डॉ. जगदीश पाटील ,जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष एस. ए. भोई, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल वाडीले, सौ. सुमन संजय चौधरी पाटील, सेवादल महिला तालुकाध्यक्ष, जिल्हा मागासवर्गीय सेलचे उपाध्यक्ष बि.डी. गवईसाहेब, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजू जाधव, ओबीसी सेलचे अध्यक्ष निखिल चौधरी, सेवादलाचे अध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते एन आर.चव्हाण सर, ॲड. रमेश हागे,नामदेवराव भोई, शामराव भोई, युवा नेत्या गोपिका संजय पाटील यांच्या सह्या आहेत.



