महाराष्ट्रविदर्भ

मा. सभापती मिरगेंचा नामंजूर अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडून मंजूर

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोविंदराव मिरगे यांच्या छाननी दरम्यान नामंजूर अर्जाना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यानंतर मंजूर केल्याची माहिती शेतकरी विकास पॅनलकडून देण्यात आली आहे.५ एप्रिल रोजी छाननी दरम्यान माजी सभापती गोंविदराव मिरगे यांनी सोसायटी मतदारसंघातून भरलेल्या सर्वसाधारण व ओबीसी प्रवर्गातील अर्जांवर तसेच ग्रामपंचायत मतदारसंघातील अर्जावर सुध्दा आक्षेप घेण्यात आला होता. त्यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचे सोसायटी मतदारसंघातील दोन्ही अर्ज नामंजूर तरग्रामपंचायत मतदारसंघातील अर्ज मंजूर केला होता. गोविंदराव मिरगे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाद मागितली असता आज दुपारी झालेल्या सुनावणीत गोविंदराव मिरगे यांचे सोसायटी मतदारसंघातील नामंजूर दोन्ही अर्ज कायम ठेवण्यात येत असल्याचा निर्णय देण्यात आला आहे.माजी सभापती गोविंदराव मिरगे यांचे अर्ज मंजूर झाल्याने निवडणूकीतील चूरस वाढणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button