मुक्ताईनगर मध्ये जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी शिक्षक तसेच महसूल विभागा सह सर्व कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

मुक्ताईनगर मध्ये जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी शिक्षक तसेच महसूल विभागा सह सर्व कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे):-सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्यभरातील कर्मचारी संघटनांनी तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करा अन्यथा काम बंद आंदोलन केले जाईल असा इशारा काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी इशारा दिलेला होता परंतु महाराष्ट्र राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने याला गांभीर्याने घेतले नाही त्याची परिणीती म्हणून आज पासून महाराष्ट्र राज्यातील सगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली त्याच अनुषंगाने मुक्ताईनगर मध्ये सुद्धा शिक्षक महसूल पंचायत समिती बांधकाम विभाग अशा सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले सर्व कर्मचारी आज पंचायत समिती मुक्ताईनगर येथे जमून त्या ठिकाणाहून तहसील कार्यालय मुक्ताईनगर येथे एक भव्य मोर्चाचे आयोजन केले होते एकच मिशन जुनी पेन्शन अशा आशयाच्या घोषणेने परिसर दणाणून सोडला या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत तहसीलदार श्वेता संचेती यांना निवेदन दिले तसेच शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा गट शिक्षणाधिकारी बि .डी. झाडे यांना निवेदन दिले सरकारने याकडे लवकर लक्ष दिले नाही जर जुनी पेन्शन योजना सुरू केली नाही तर कामावर परत न फिरण्याचा आणि आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा सुद्धा कर्मचाऱ्यांनी यावेळी दिलेला आहे



